लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : भरधाव दुचाकी घसरून दुचाकीवरील सहप्रवासी शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगदा परिसरात घडली.

आदित्य सचिन भिंताडे (वय १२, रा. मोडक वस्ती, जांभुळवाडी रस्ता, आंबेगाव बुद्रुक) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहेत. अपघातात आदित्यचे दुचाकीस्वार वडील सचिन (वय ४३), आई वासंती (वय ३८) जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आणखी वाचा-पिंपरी : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई म्हणाले, हेच न्यायाधीशाचे कर्तव्य…

सचिन, पत्नी वासंती, मुलगा आदित्य बाह्यवळण मार्गावरून रविवारी दुपारी साताऱ्याकडे निघाले होते. नवीन कात्रज बोगद्याजवळ सचिन यांचे नियंत्रण सुटले. दुचाकी घसरल्याने सचिन, त्यांचा मुलगा आदित्य, पत्नी वासंती यांना दुखापत झाली. तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आदित्य याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: School boy died after falling off bike near the new katraj tunnel pune print news rbk 25 mrj