आळंदीत स्कुल बस वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला होता. स्कुल बस ने इंद्रायणी नदीचा कठडा तोडून अपघात झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने ही बस नदीत कोसळली नाही. हा अपघात चार च्या सुमारास घडला आहे. बसमध्ये ५० पेक्षा अधिक विद्यार्थी होते, अशी माहिती मिळत आहे.
हेही वाचा >>> माउलींच्या पालखी सोहळ्यात सिलेंडरने घेतला पेट;अग्निशमन दलाच्या जवानांकडून वेळीच आग आटोक्यात
मिळालेल्या माहितीनुसार, आळंदी – मरकळ रोडवरून स्कुल बस विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. इंद्रायणी पुलावर बस येताच चालकाचे नियंत्रण सुटले, बस थेट नदीच्या कठड्याला धडकली. बस चा काही भाग कठड्याला तोडून नदीच्या दिशेने गेला होता. सुदैवाने तेथील स्थानिक नागरिक धावत आले. बस च्या खिडकीच्या काचा फोडून विद्यार्थ्यांना बाहेर काढले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. अन्यथा बस नदीत कोसळली असती तर मोठी जीविहितहानी झाली असती. बसमध्ये ५० पेक्षा अधिक विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती आहे.