पुणे : केंद्र सरकारने मराठीला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा अलीकडेच दिला आणि राज्यभरात त्याचा जल्लोषही झाला. मात्र आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून अंतिम करण्यात आलेल्या राज्याच्या शालेय अभ्यासक्रम आराखड्यात मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी विषय पहिलीपासून सक्तीने शिकविण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा तयार केला आहे. सुकाणू समितीने या अभ्यासक्रम आराखड्याला अंतिम मंजुरी दिली असून आता त्यानुसार पाठ्यक्रम तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार आता सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये तीन भाषांचे पाठ्यक्रम लागू केले जातील. सहावी ते दहावीसाठी इंग्रजी वगळता परकीय भाषा पाठ्यक्रम केवळ ५० गुणांसाठी असेल, तर अकरावी, बारावीसाठी परकीय भाषांचा अभ्यासक्रम शंभर गुणांसाठी असेल. मराठी आणि इंग्रजी माध्यमासाठी तृतीय भाषा म्हणून हिंदी भाषा विषय पहिलीपासून सुरू करण्यात येणार आहे. सक्तीने  शिकवल्या जाणाऱ्या मराठी भाषा विषयात तीन गट करण्यात आले आहेत. दहावीपर्यंत मराठी भाषेसह शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी शंभर गुणांचा व्यावहारिक मराठी हा विषय शिकवला जाईल. दहावीपर्यंत मराठी भाषेशिवाय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी शंभर गुणांचा कार्यात्मक मराठी, इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी शंभर गुणांचा सामान्य मराठी असा विषय उपलब्ध करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>दप्तराचे ओझे हे शरीराच्या वजनाच्या १५ टक्केपेक्षा जास्त नको…

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणावर भर देण्यात आल्याचा गाजावाजा करण्यात आला. आता लपूनछपून हिंदी विषय पहिलीपासून आणण्यात आला आहे. भाषेचा दुस्वास करण्याचे कारण नाही. मात्र, इतक्या लहान वयात तीन भाषा शिकणे मुलांसाठी अन्यायकारक ठरेल. – डॉ. मिलिंद जोशीकार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: School curriculum hindi subject is compulsory from the first in marathi and english medium schools mumbai news amy
Show comments