पुणे : शाळकरी मुलगी, तसेच तिच्या भावाला जिवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीनांनी तिच्याशी अश्लील कृत्य केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी दोन अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत एका शाळकरी मुलीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, अल्पवयीनांविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला. पीडीत १४ वर्षीय मुलगी एका शाळेत आहे. नोव्हेंबर महिन्यापासून अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत होती. मुलीला अडवून एका अल्पवयीनाने तू मला आवडते. माझ्यासोबत बोलली नाही, तर समाजात तुझी बदनामी करेल, अशी धमकी दिली. अल्पवयीनाने धमकी दिल्यानंतर मुलीने या प्रकाराची माहिती पालकांना दिली. तेव्हा तिच्या पालकांनी अल्पवयीन आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदाराला समज दिली.

हेही वाचा…तडीपार गुंडाला येरवड्यात पकडले

त्यानंतर मुलगी शनिवारी (७ डिसेंबर) शाळेत गेली होती. अल्पवयीन आणि त्याचा मित्र शाळेत गेले. मुलीला शाळेबाहेर बोलाविले. मुलीला दुचाकीवरुन शाळेच्या परिसरातील मोकळ्या जागेत नेले. अल्पवयीनाने तिच्याशी अश्लील कृत्य केले. त्याच्याबरोबर असलेल्या मित्राने मोबाइलवर छायाचित्र काढले. या प्रकाराची कोणाकडे वाच्यता केल्यास समाज माध्यमात छायाचित्रे प्रसारित करू, तसेच मुलगी आणि तिच्या भावाला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या धमकीमुळे घाबरलेल्या मुलीने अखेर पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.

हेही वाचा…कर्वेनगरमध्ये मद्यपींकडून तरुणावर हल्ला, तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गु्न्हा

शहर, तसेच उपनगरात अल्पवयीन मुलींशी अश्लील कृत्य करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा घटनांना वाचा फोडण्यासाठी शालांमध्ये समुपदेशन करण्यात येत आहे. शाळा, तसेच परिसरात कोणी छेड काढली किंवा अश्लील कृत्य केल्यास त्वरीत पोलिसांकडे तक्रार देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: School girl and her brother molested by minors who threatened to kill her pune print news rbk 25 sud 02