शिकवणीला जात असलेल्या सायकलस्वार शाळकरी मुलीचा भरधाव डंपरच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना लोहगाव परिसरात घडली. अपघातानंतर पसार झालेल्या डंपरचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रोशनी बाबा अंगरखे (वय १५, रा. शौर्या पार्क, पठारे वस्ती, लोहगाव) असे मृत्युमुखी पडलेल्या शाळकरी मुलीचे नाव आहे. याबाबत रोशनीचे वडील बाबा अंगरखे (वय ५०) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बाबा अंगरखे लष्करातून निवृत्त झाले आहेत.

रोशनी विश्रांतवाडी भागातील आर्मी पब्लिक स्कुलमध्ये दहावीत शिक्षण घेत होती. सायकलस्वार रोशनी दुपारी शिकवणीला जात होती. त्या वेळी भरधाव डंपरने पठारे वस्ती परिसरातील एम. जी. ब्रिलीएंट शाळेजवळ सायकलस्वार रोशनीला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या रोशनला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा : मुंबई महापालिका महायुतीच जिंकणार ; रामदास आठवलेंनी व्यक्त केला विश्वास

उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.रोशनीचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. रोशनी हुशार आणि मनमिळाऊ स्वभावाची होती. पसार झालेल्या डंपरचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक शिवदास लहाने तपास करत आहेत.

Story img Loader