पुणे : रिक्षाचालकाने शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याची घटना पर्वती परिसरातील जनता वसाहतीत घडली. याप्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत मुलीच्या आईने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार महिलेची मुलगी शाळेतून रिक्षाने घरी निघाले होते. त्यावेळी रिक्षाचालकाने आरशातून मुलीकडे एकटक पाहून तिला इशारा केला. त्यानंतर मुलगी पु्न्हा शाळेत निघाली.
हेही वाचा >>> पुणे : पतीच्या त्रासामुळे महिलेची मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या,पतीला दहा वर्षे सक्तमजूरी
रिक्षाचालकाने तिचा पाठलाग केला. मुलीला जनता वसाहत पोलीस चौकीसमोर काही अंतरावर अडवले. तू मला आवडते. आपण पळून जाऊन लग्न करू, असे त्याने मुलीला सांगितले. रिक्षाचालकाच्या त्रासामुळे घाबरलेल्या मुलीने या घटनेची माहिती आईला दिली. त्यानंतर रिक्षाचालकाविरुद्ध विनयभंग, तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक घावटे तपास करत आहेत.