पुणे : शाळकरी मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन ७८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने अत्यााचर केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ज्येष्ठ नागरिकाने मुलीच्या गळ्याला चाकू लावून तिला धमकावले. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत पीडित मुलीच्या आजीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मधुकर पिराजी थिटे (वय ७८, रा. धनकवडी) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकाने सात वर्षांच्या मुलीला खाऊ देण्याच्या आमिषाने घरी नेले. त्याने मुलीवर अत्याचार केले. मुलीने आरडाओरडा केला. तेव्हा त्याने मुलीच्या गळ्याला चाकू लावला. या घटनेची कोणाला वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, असे मुलीच्या आजीने फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा >>>पुणे: शहरात वेगवेगळ्या अपघातात ज्येष्ठ नागरिकासह तिघांचा मृत्यू

घाबरलेल्या मुलीने या घटनेची माहिती आजीला दिली. त्यानंतर बालकांचे लैगिंक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस आयुक्त नंदिनी वग्यानी-पराजे तपास करत आहेत.

खाऊच्या आमिषाने मुलीवर अत्याचार

खाऊच्या आमिषाने मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची आणखी एक घटना घडली. याप्रकरणी ज्येष्ठ नागरिकाविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महावीर श्रीमलजी सिंगवी (वय ७०) असे गु्न्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. सिंगवीने आठ वर्षांच्या मुलीला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले. शहर, परिसरात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढीस लागले आहेत. बहुतांश घटनांमध्ये नात्यातील, तसेच ओळखीतील आरोपींनी अत्याचार केल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: School girl molested by senior citizen by threatening to kill her pune print news rbk 25 amy