शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका क्रीडा शिक्षकाला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी क्रीडा शिक्षक अजय राजाराम सोनवणे (वय ३२, रा. मांजरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका पालकाने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मांजरी खुर्द भागातील एका शाळेत सोनवणे क्रीडाशिक्षक आहे. शाळेतील मैदानावर क्रीडा शिक्षक सोनवणे याने शाळकरी मुलीचा विनयभंग केला. सहायक पोलीस निरीक्षक राजगुरू तपास करत आहेत.