पुणे : शाळकरी मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या एका युवकाच्या विरोधात खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.या प्रकरणी साई गायकवाड (वय १९, रा. मुंढवा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी गायकवाड याच्याशी मुलीची ओळख झाली होती. गायकवाडने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. मुलगी गर्भवती झाली. खडकी भागातील एका रुग्णालयात मुलगी प्रसुत झाली. तेव्हा नवजात अर्भक मृत असल्याचे आढळून आले.
हेही वाचा: क्रिकेट सामना पाहणाऱ्या तरुणांना बेदम मारहाण; येरवडा भागातील घटना
चौकशीत गायकवाडने मुलीवर बलात्कार केल्याचे उघडकीस आल्यानंतर तिच्या आईने पोलिसांकडे तक्रार दिली. बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक वाळकोळी तपास करत आहेत.