शहरांमध्ये आठवी-बारावी, ग्रामीण भागांत पाचवी-सातवीसाठी शिक्षण विभागाचा निर्णय

पुणे : राज्यात करोनामुक्त भागांतील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आल्यानंतर आता शहरी भागांतील आठवी ते बारावीचे आणि ग्रामीण भागात पाचवी ते सातवीचे वर्ग १७ ऑगस्टपासून सुरू करण्यास शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे. शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या असून, महापालिका क्षेत्रासाठी आयुक्तांच्या, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत स्तरासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्याच्या, शिक्षकांचे लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यंदाही ऑनलाइन पद्धतीनेच शैक्षणिक वर्ष सुरू करावे लागले. मात्र ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शाळा सुरू करण्याची मागणी करण्यात येऊ लागली. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) घेतलेल्या सर्वेक्षणात ८१.१८ टक्के पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास तयार असल्याचा निष्कर्ष दिसून आला. त्यामुळे करोनाचा प्रभाव कमी असलेल्या भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास ७ जुलैला मान्यता देण्यात आली. त्यानुसार राज्यातील बहुतांश जिल्ह्य़ांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. आता पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू करण्यासही शिक्षण विभागाने मंगळवारी परिपत्रकाद्वारे मान्यता दिली.

राज्यातील ग्रामीण भागांत १७ ऑगस्टपासून पाचवी ते सातवीचे वर्ग, शहरी भागांत आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहरातील करोनाची परिस्थिती लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यासाठी संबंधित महापालिका आयुक्तांना अधिकार देण्यात आले आहेत. तसेच २ ऑगस्टच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर जिल्ह्य़ांतील (पान २ वर) (पान १ वरून) करोनास्थिती विचारात घेऊन, अन्य जिल्ह्य़ांबाबतही शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी जिल्ह्य़ाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. महापालिका क्षेत्रात शाळा सुरू करण्याबाबत महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये क्षेत्रीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, शिक्षणाधिकारी-शिक्षण निरीक्षक यांचा समावेश असेल. नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत स्तरांवर शाळा सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये नगर परिषदेचे मुख्याधिकारी, वैद्यकीय अधिकारी किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी, प्राथमिक-माध्यमिकचे शिक्षणाधिकारी यांचा समावेश असेल, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

मार्गदर्शक सूचना

  • शाळा सुरू करण्यापूर्वी कमीतकमी एक महिना संबंधित शहर, गावात करोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.
  • शिक्षकांचे लसीकरण करणे आवश्यक. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे.
  • गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या आवारात पालकांना प्रवेशास मनाई.
  • जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांत, एका बाकावर एक विद्यार्थी, दोन बाकांमध्ये सहा फू ट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी.
  • मुखपट्टीचा वापर, साबणाने हात धुणे, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांला घरी पाठवून करोना चाचणी करून घेणे.
  • विद्यार्थ्यांला करोना संसर्ग झाल्यास तात्काळ शाळा बंद करून शाळा निर्जंतुक करावी. विद्यार्थ्यांचे विलगीकरण करून वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने उपचार सुरू करावेत.