लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शालेय शिक्षण विभागाच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळांनी यश मिळवले. विशेष म्हणजे, पारितोषिकप्राप्त शाळांमध्ये खासगी अनुदानित शाळांसह जिल्हा परिषद आणि महापालिका शाळांचा समावेश आहे.

Shivaji Park ground, Shivaji Park, MNS Shivaji Park,
शिवाजी पार्कचे मैदानाचा निर्णय गुलदस्त्यात, महायुतीने मैदान अडवल्यामुळे ४५ दिवसांची मर्यादा संपल्याचा मनसेचा आरोप
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
home voting in nala sopara
वसई: नालासोपाऱ्यात १२१ नागरिकांचे गृहमतदान
railway passengers issues, railway passenger association, election campaign,
प्रचारात आम्ही आहोत कुठे ? रेल्वे प्रवासी, संघटनांचा उमेदवारांना प्रश्न
Jharkhand campaign trail
आश्वासनं देण्याची चढाओढ, झारखंडमझ्ये भाजपा-इंडिया आघाडीत वेगळीच स्पर्धा!
Devendra Fadnavis Constituency, Sachin Waghade,
फडणवीसांच्या मतदारसंघातील उमेदवार म्हणतो, “मी बेरोजगार, मला मत द्या…”

शासकीय शाळा गटात धानोरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरीय पुरस्कार पटकावला. विभाग स्तरावरील खासगी शाळा गटात नारायणगाव येथील गुरुवर्य आर. पी. सबनीस विद्यामंदिरने प्रथम क्रमांक, शासकीय शाळा गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसनने तृतीय क्रमांक मिळवला. विभागीय स्तरावरील अ व ब वर्ग महापालिका खासगी शाळा गटात न्यू इंग्लिश स्कूल टिळक रस्ता या शाळेने प्रथम क्रमांक, श्री शिवाजी मराठा हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने तृतीय क्रमांक पटकावला. शासकीय शाळा गटात पुणे महापालिकेच्या विद्या निकेतन १६ या शाळेने प्रथम, तर विद्यानिकेतन एक या शाळेने तृतीय क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच मुंबई येथे झाला.

आणखी वाचा-अनुदानित खासगी आयुर्वेद, युनानी महाविद्यालयांना मिळणार प्राध्यापक; वैद्यकीय शिक्षण विभागाकडून निवड समितीची रचना जाहीर

न्यू इंग्लिश स्कूल टिळक रस्ता शाळेने मिळवलेल्या यशाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत, उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे, कार्यवाह आनंद काटीकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता राव, शाला समिती अध्यक्ष खेमराज रणपिसे या वेळी उपस्थित होते. स्पर्धेसाठी विद्यार्थी आणि शिक्षकांनी अतिशय नियोजनपूर्वक काम केले. त्यामुळे स्पर्धेतील विविध निकषांची पूर्तता करता आली. शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम नियमितपणे राबवले जातात. अध्ययनस्तर उंचावण्यासह विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावरही भर दिला जातो, असे राव यांनी सांगितले. शाळेने केलेली कामगिरी आनंददायी आहे. शाळेला मिळालेल्या पारितोषिकाच्या रकमेचा उपयोग शाळेतील विविध सुविधा निर्मितीसाठी करण्यात येणार आहे. या सुविधा निर्मितीसाठी संस्थेकडून निधी उपलब्ध करून देण्यासह उद्योग क्षेत्रातून सामाजिक उत्तरदायित्त्व निधी, माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलनही करण्यात येईल, अशी माहिती रावत यांनी दिली.