केपीआयटी कमिन्सतर्फे ‘छोटे सायंटिस्ट्स’ या उपक्रमांतर्गत मुलांसाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनामध्ये १०० प्रकल्प मांडण्यात आले होते, तर आठशे विद्यार्थी सहभागी झाले होते.
केपीआयटी कमिन्सतर्फे विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ संशोधक डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी डॉ. माशेलकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘लहान मुलांनी विज्ञानाची कार्यप्रणाली समजून घेणे आणि त्यांना ती समजणे आवश्यक आहे. सुपर पॉवर होण्यासाठी अशा अभिनव उपक्रमांची गरज आहे.’’ या वेळी केपीआयटी कमिन्सचे अध्यक्ष रवि पंडित, ज्ञान प्रबोधिनीचे विवेक पोंक्षे उपस्थित होते. पर्यावरण संरक्षण, जल संरक्षण अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रकल्प सादर केले होते.