पुणे : बिपरजॉय चक्रीवादळामुळे राज्यात नैऋत्य मोसमी वाऱ्यांची गती मंदावली असून रत्नागिरीच्या पुढे त्यांची फारशी प्रगती झालेली नाही. परिणामी, मोसमी पाऊस अद्याप कोकणातच रेंगाळल्याचे चित्र आहे. परंतु राज्याच्या काही भागांत २२ जूनपर्यंत पूर्वमोसमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

चक्रीवादळामुळे रत्नागिरीच्या आसपासच्या भागात रेंगाळलेले मोसमी वारे वादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर पुढे सरकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळानंतर मोसमी वाऱ्यांची वाटचाल सुकर होणार असून ते पूर्व भारत आणि दक्षिण द्विपकल्पाच्या दिशेने १९ ते २२ जूनच्या दरम्यान सरकतील. या काळात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागांत मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पूर्वमोसमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर कोकणात तुरळक भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे शहरासह पिंपरी- चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात २२ जूनपर्यत विजांच्या कडकडाटसह हलक्या पावसाची शक्यता पुणे वेध शाळेने व्यक्त केली आहे. राज्यातील बहुतांश भागांत सध्या उन्हाचा चटका जाणवत आहे. जूनचा दुसरा आठवडा संपत आला, तरी मोसमी पावसाचा पत्ता नाही. विदर्भात तापमान सरासरीपेक्षा पाच ते सात अंशांनी वाढले आहे. विदर्भातील गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यांत पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. जूनच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत पूर्व मोसमी पाऊस होऊन वातावरणात गारवा निर्माण होतो. तसेच तापमानातही घट होते. मात्र, यंदा तापमान वाढले आहे.

Prahlad Joshi statement that the plan of Congress in Karnataka is on the verge of closure Kolhapur news
काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
konkan hapus mango season likely to deley due to prolonged monsoon
लोकशिवार: लांबलेल्या पावसाने ‘आंबा’ही लांबवला
strawberry season start late by 15 days leading to limited market supply
बदलत्या हवामानाने स्ट्रॉबेरीचा हंगामाला विलंब
Maha Vikas Aghadi And Mahayuti Battle For Votes
अग्रलेख : गॅरंट्यांचा शाम्पू!
boney kapoor financial crisis roop ki raani movie
दिग्दर्शकाने अर्ध्यावर सोडली साथ; फ्लॉप झाला बिग बजेट सिनेमा, बोनी कपूर यांना कर्ज फेडायला लागली होती ‘इतकी’ वर्षे

अंदाज काय?

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागांत मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पूर्वमोसमीची शक्यता.
कोकणात तुरळक भागांत हलका पाऊस पडण्याचा अंदाज
पुणे शहरासह पिंपरी- चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागांत २२ जूनपर्यंत हलक्या पावसाची शक्यता
विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा
विदर्भात पुढील चार ते पाच दिवस पुन्हा उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाने विदर्भाला पिवळा आणि नारंगी इशारा दिला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातील काही भागांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
वादळाचे रूपांतर कमी दाबाच्या पट्टय़ात
बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता १८ जूनपासून कमी होऊन त्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्टय़ात होणार आहे. सध्या वादळाचे अतितीव्र कमी दाबाच्या पट्टय़ात रूपांतर झाले असून सध्या ते गुजरात, दक्षिणपूर्व राजस्थान आणि पूर्व पाकिस्तानच्या दरम्यान समुद्रात आहे.