पुणे : महायुतीच्या जागावाटपासाठी तिन्ही घटक पक्षांचे प्रमुख नेते उद्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे जागावाटपाचे चित्र दोन दिवसांत स्पष्ट होईल. त्यानंतर आम्हीही लवकरच आमचे उमेदवार जाहीर करणार आहोत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी सांगितले. दरम्यान, सर्वांचा सन्मान होईल, अशा पद्धतीने जागावाटप होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> राज्यातील ५०६ प्रकल्पांचे उद्या भूमिपूजन, लोकार्पण; पंतप्रधान मोदी यांची दृकश्राव्य माध्यमातून उपस्थिती

पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, महाविकास आघाडीचा बारामती मतदारसंघातील उमेदवार जाहीर झाला असून, आमचाही उमेदवार लवकरच घोषित करू. महायुतीच्या ४८ जागांचा निर्णय झाल्यानंतर आम्ही आमचे उमेदवार जाहीर करू. आम्ही किती जागा मागितल्या हे जाहीर करणार नाही परंतु, व्यवस्थित जागा मागितल्या आहेत. तिन्ही पक्षांचा सन्मान राहील अशा पद्धतीने जागावाटप

होईल.  उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे. ही बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह मी दिल्लीला जाणार आहे. तिथे जागावाटपावर चर्चा होईल. जागावाटप उद्या अंतिम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोनच दिवसांत याबाबत चित्र स्पष्ट झालेले दिसेल, असे पवार यांनी सांगितले.