अकरावी केंद्रीय प्रवेशाची दुसरी प्रवेश यादी शनिवारी जाहीर झाली असून दुसऱ्या फेरीमध्ये १३ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांना दोन्हीही याद्यांमध्ये प्रवेश मिळालेला नाही, त्यांना तिसऱ्या यादीमध्ये प्रवेश देण्यात येईल,’ अशी माहिती अकरावी केंद्रीय प्रवेश समितीच्या अध्यक्ष सुमन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची दुसरी प्रवेश यादी शनिवारी जाहीर झाली. या फेरीमध्ये १३ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यापैकी ४ हजार ६९४ विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेश मिळणार आहे, तर ८ हजार ४७६ विद्यार्थ्यांना बेटरमेंट देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांचे नाव दोन्हीही याद्यांमध्ये लागलेले नाही. त्यांना तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. तिसरी प्रवेश यादी ११ जुलैला जाहीर करण्यात येणार आहे.
‘ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंटनुसार दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनी पहिल्या यादीनुसार घेतलेला प्रवेश रद्द करायचा आहे. पहिल्या महाविद्यालयातील प्रवेश रद्द केल्यानंतरच विद्यार्थ्यांना दुसऱ्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेता येणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केल्याची पावती दाखवणे बंधनकारक आहे. ज्या विद्यार्थ्यांचे नाव पहिल्यांदाच प्रवेश यादीत लागले आहे, त्यांना तिसऱ्या प्रवेश यादीमध्ये बेटरमेंटची संधी मिळणार आहे,’ असे शिंदे यांनी सांगितले.
शाखेनुसार मिळालेले प्रवेश
विज्ञान इंग्रजी माध्यम ५८२३, वाणिज्य मराठी माध्यम – ३६६५, वाणिज्य इंग्रजी माध्यम – ३४८०, कला मराठी माध्यम – १०२, कला इंग्रजी माध्यम – १००
बेटरमेंट मिळालेले विद्यार्थी
विज्ञान इंग्रजी माध्यम – ४१८६, वाणिज्य मराठी माध्यम – १९२८, वाणिज्य इंग्रजी माध्यम – २१७७, कला मराठी माध्यम – ९३, कला इंग्रजी माध्यम – ९२
परवानगीशिवाय प्रवेश करणाऱ्यांवर कारवाई
‘केंद्रीय समितीची परवानगी न घेता परस्पर प्रवेश करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येईल,’ असा इशारा शिंदे यांनी दिला आहे. गेल्यावर्षी स.प. महाविद्यालयाने अशा प्रकारे प्रवेश प्रक्रिया केली होती. त्या पाश्र्वभूमीवर शिंदे यांना विचारले असता त्यांनी सांगितले, ‘परस्पर प्रवेश करू नयेत अशा सूचना सर्व महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. महाविद्यालयाने विनापरवानगी प्रवेश केले, तर त्याची जबाबदारी प्राचार्याची राहील. त्याचप्रमाणे या प्रवेशांना मंजुरी देण्यात येणार नाही.’
दुसऱ्या यादी अखेर कट ऑफ
विज्ञान शाखा
फग्र्युसन (९४.२), एस. एम. चोक्सी (९२.५), मॉडर्न (९१.४), स.प (९१.४), आबासाहेब गरवारे (९१.२)
वाणिज्य शाखा
बी.एम.सी.सी (९२.८), गरवारे वाणिज्य (८८.४), सिम्बॉयसिस (८७), एस. एम. चोक्सी (८६), स.प (८३.२)
कला शाखा
फग्र्युसन (९२.६), स.प (८५.८), मॉडर्न (७८.४), नौरोसजी वाडिया (७४.६).

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा