पुणे : विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्यात येणार आहेत. या प्रवेश परीक्षांच्या नोंदणीसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार आता विद्यार्थ्यांना १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे.सीईटी सेलने या बाबतची माहिती परिपत्रकाद्वारे दिली. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुकला, विधी, डिझाइन, हॉटेल मॅनेजमेंट अशा विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. सीईटीसाठी नोंदणीसाठी १६ ते ३० जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र काही विद्यार्थ्यांना अर्ज भरता न आल्याने ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र आतापर्यंत झालेल्या नोंदणीत अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा