लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी: गृहनिर्माण सोसायटीमधील पार्किंगमध्ये खेळत असलेल्या सात वर्षीय मुलीवर सुरक्षा रक्षकाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना पुनावळे येथील एका सोसायटीमध्ये बुधवारी (दि.२६) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.
याप्रकरणी मुलीच्या आईने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सुरक्षारक्षक मन्टुकुमार श्रीशिवकुमार गौंड (वय ३०, रा. पुनावळे) याला अटक करण्यात आले.
आणखी वाचा- डॉक्टरकडून रुग्ण महिलेवर बलात्कार; कात्रज भागातील घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची सात वर्षांची मुलगी मैत्रिणीसोबत सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळत होती. त्यावेळी सोसायटीचा सुरक्षारक्षक गौंड याने मुलीला जबरदस्तीने कार्यालयाशेजारील स्वच्छतागृहामध्ये नेले. तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. रावेत पोलीस तपास करत आहेत.