किरकोळ कारणावरून डॉक्टरकडून झालेल्या मारहाणीत एका एका रखवालदाराचा सोमवारी मृत्यू झाला. कोरेगाव पार्क भागातील विंटर बेरी या उच्चभ्रू सोसायटीमध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिजित खानविलकर असे या डॉक्टरचे नाव आहे. या घटनेत सर्जेराव गणपत साठे (वय ४९, रा. मुंढवा) या रखवालदाराचा मृत्यू झाला आहे. २७ जुलैला सोसायटीचे दार उघडण्याच्या कारणावरून खानविलकर यांनी साठे यांना मारहाण केली होती. त्यात तोल जाऊन पडल्याने साठे यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. रुग्णालयात उपचारानंतर ते घरीही गेले होते. मात्र, त्यानंतर ते मुंढवा परिसरात बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यानंतर खानविलकर यांच्यावर गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बेशुद्ध अवस्थेतच साठे यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर उपचारादरम्यान सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर खानविलकर यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना या प्रकरणी अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
डॉक्टरकडून मारहाणीत रखवालदाराचा मृत्यू
किरकोळ कारणावरून डॉक्टरकडून झालेल्या मारहाणीत एका एका रखवालदाराचा सोमवारी मृत्यू झाला. कोरेगाव पार्क भागातील विंटर बेरी या उच्चभ्रू सोसायटीमध्ये हा प्रकार घडला.
First published on: 06-08-2013 at 02:34 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Security guard died in doctors beating