किरकोळ कारणावरून डॉक्टरकडून झालेल्या मारहाणीत एका एका रखवालदाराचा सोमवारी मृत्यू झाला. कोरेगाव पार्क भागातील विंटर बेरी या उच्चभ्रू सोसायटीमध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिजित खानविलकर असे या डॉक्टरचे नाव आहे. या घटनेत सर्जेराव गणपत साठे (वय ४९, रा. मुंढवा) या रखवालदाराचा मृत्यू झाला आहे. २७ जुलैला सोसायटीचे दार उघडण्याच्या कारणावरून खानविलकर यांनी साठे यांना मारहाण केली होती. त्यात तोल जाऊन पडल्याने साठे यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. रुग्णालयात उपचारानंतर ते घरीही गेले होते. मात्र, त्यानंतर ते मुंढवा परिसरात बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यानंतर खानविलकर यांच्यावर गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बेशुद्ध अवस्थेतच साठे यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर उपचारादरम्यान सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर खानविलकर यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना या प्रकरणी अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा