६० टक्के पहारेकरी झोपेत असल्याचे वाकड पोलिसांच्या सर्वेक्षणातून स्पष्ट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विविध सोसायटय़ा आणि गृह योजनांमधील सुरक्षा व्यवस्था सुरक्षारक्षकांच्या हाती सोपविणे धोकादायक असल्याचे पोलिसांच्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. वाकड पोलिसांनी वाकड परिसरातील चारशे गृहनिर्माण संस्थांची पहाटे अडीच ते चार दरम्यान अचानक पाहणी केली असता तेथील साठ टक्के सुरक्षारक्षक गाढ झोपलेले आढळले.

दिवाळीच्या सुटय़ांमुळे अनेक कुटुंबं परगावी वा पर्यटनाला जातात. त्यामुळे दिवाळीमध्ये अनेक घरे कुलूपबंद केलेली असतात. अशा वेळी या घरांची सुरक्षा सुरक्षारक्षकांच्या हाती  असते. बंद घरांमध्ये चोऱ्यांचे प्रकार घडतात. या चोऱ्यांना सुरक्षारक्षकांचा निष्काळजीपणा हेही कारण असल्याचे पोलिसांच्या पाहणीमुळे स्पष्ट झाले आहे.

पोलीस आयुक्त आर. के.पद्मनाभन यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या पोलीस निरीक्षकांना गृहनिर्माण संस्थांची माहिती संकलित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वाकड पोलिसांनी वाकड परिसरातील चारशे गृहनिर्माण संस्थांची माहिती घेऊन पदाधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक संकलित केले होते. संकलित केलेल्या माहितीनुसार वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांचे ३५ गट तयार करुन वाकड परिसरातील सर्व गृहनिर्माण संस्थांमधील सुरक्षारक्षक सतर्क आहेत किंवा नाहीत याचा पहाटे आढावा घेतला.

पस्तीस गटांमधील प्रत्येकाला दहा सोसायटय़ांमध्ये तपासणीचे काम देण्यात आले होते. त्यानुसार सुरक्षारक्षकांची पाहणी केली असता साठ टक्के सुरक्षारक्षक गाढ झोपी गेल्याचे आढळून आले. झोपलेल्या सुरक्षारक्षकांची छायाचित्र काढून ते सुरक्षा एजन्सी तसेच सोसायटीच्या अध्यक्षांकडे देण्यात आली आहेत. त्यामुळे झोपलेल्या सुरक्षारक्षकांवर कारवाई केली जाणार आहे. अशी मोहीम दिवाळीमध्ये राबवण्यात येणार आहे. सुरक्षारक्षकाच्या हाती सुरक्षा सोपविताना सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी केले आहे.

मोहिमेचे स्वरूप

* पोलीस निरीक्षकांना गृहनिर्माण संस्थांची माहिती संकलित करण्याच्या सूचना

* पोलिसांकडून वाकड परिसरातील ४०० गृहनिर्माण संस्थांची माहिती संकलित

* पोलीस कर्मचाऱ्यांचे ३५ गट तयार करून पहाटे आढावा.

* झोपलेल्या सुरक्षारक्षकांची छायाचित्रे सुरक्षा एजन्सी तसेच सोसायटीच्या अध्यक्षांना पाठवली.