लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : पार्सल देण्याच्या बहाण्याने सदनिकेत आलेल्या सोसायटीतील सुरक्षारक्षकाने तरुणीचा विनयभंग केल्याची घटना कल्याणीनगर भागातील एका सोसायटीत घडल. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी सुरक्षारक्षकाला अटक केली.

आणखी वाचा-पुणे: स्विफ्ट ने गर्भवती महिलेला दिली जोरात धडक; घटना सीसीटीव्हीत कैद, चालक फरार

विक्रम लक्ष्मण वाघ (वय २५) असे अटक करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. याबाबत एका २८ वर्षीय तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी तरुणी कल्याणी नगर भागातील एका सोसायटीत दहाव्या मजल्यावर राहायला आहे. तरुणीने ऑनलाइन पद्धतीने काही वस्तू मागविल्या होत्या. या वस्तू देण्याच्या बहाण्याने सुरक्षारक्षक विक्रम वाघ सदनिकेत शिरला. तरुणीकडे पाहून त्याने अश्लील वर्तन केले. तरुणीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वाघला अटक करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक लामखेडे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Security guard of society molested the young woman by pretext of delivering the parcel pune print news rbk 25 mrj