लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : लष्कर भागात बँकेचा दरवाजा उचकटून चोरी प्रयत्न करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी अटक केली. संबंधित सुरक्षा रक्षकाला तीन महिन्यांपूर्वी कामावरुन काढून टाकण्यात आले होते. बँकेतील व्यवस्थेची माहिती असल्याने सुरक्षा रक्षकाने बँकेचा दरवाजा उचकटला. पोलिसांचे प्रसंगावधान आणि बँकेतील यंत्रणेमुळे त्याला पकडण्यात यश आले.

आणखी वाचा-पिंपरी : पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून कारने दिली धडक

तपन वसंत दास (वय २९, मूळ रा. भेवला, जि. बक्सा, आसाम) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत तामिळनाडू मर्कंटाइल बँकेचे सहायक व्यवस्थापक विजयकुमार वेट्रीवेल (वय ३०) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तामिळनाडू मर्कंटाइल बँकेची लष्कर भागातील सोलापूर बाजार परिसरात शाखा आहे. दासला तीन महिन्यांपूर्वी कामावरुन काढून टाकले होते. त्यामुळे त्याला बँकेतील सुरक्षा यंत्रणेची माहिती होती. शुक्रवारी (२४ नोव्हेंबर) रात्री दहाच्या सुमारास दासने बँकेचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. सीसीटीव्ही चित्रीकरणात पकडले जाण्याची भीती वाटल्याने त्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची वायर तोडली. बँकेतील रोकड ज्या भागात ठेवली होती. तेथील कप्पा दासने उचकटण्याचा प्रयत्न केला. बँकेतील सुरक्षाविषयक यंत्रणेतील भोंगा वाजला. याबाबतची माहिती बँक अधिकाऱ्यांना मिळाली. बँकेने याबाबतची पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दासला पकडले. पोलीस उपनिरीक्षक कांबळे तपास करत आहेत.