पुणे: रात्री अकराच्या सुमारास चंदननगर पोलीस ठाण्यातील हवालदार सीमा वळवी कामावरुन घरी निघाल्या होत्या. तेवढ्यात कोयते उगारुन दहशत माजविणाऱ्या टोळक्याला वळवी यांनी पाहिले. नागरिकांची गर्दी झाली होती. सर्वजण बघ्याच्या भूमिकेत होते. गुंडांनी कोयते उगारल्याने नागरिक भयभीत झाले होते. वळवी यांनी क्षणाचा विचार न करता दुचाकी रस्त्याच्या कडेला लावली. तरुणावर कोयत्याने वार करणाऱ्या एका गुंडाला त्यांनी पकडून ठेवले. वळवी यांनी आरडाओरडा केल्याने गुंडाबरोबर असलेल्या साथीदारांनी पळ काढला. वळवी यांनी त्वरित या घटनेची माहिची चंदननगर पोलीस ठाण्यात दिली. या घटनेनंतर पसार झालेल्या गुंडांना पोलिसांनी पाठलाग करुन २० मिनिटांत पकडले.

वडगाव शेरी भागात रविवारी (२४ डिसेंबर) रात्री वैमनस्यातून तीन जणांवर कोयत्याने वार करण्यात आले. भररस्त्यात कोयते उगारुन आरोपींनी दहशत माजविली. याप्रकरणी पोलिसांनी सराइतांना अटक केली. गुंड तीन तरुणांना मारहाण करत होते. त्यांच्यावर कोयत्याने वार करुन दगड फेकून मारण्यात आले. पोलीस गणवेशात असलेल्या वळवी यांनी प्रसंगावधान राखले. पोलीस गणवेशतील वळवे यांना पाहून गुंडांनी तेथून पळ काढला.

Nana Patole
Nana Patole : “आमचे सर्व खासदार…”, महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
Only 30 percent of road works were completed during the Eknath Shinde government Mumbai news
‘दोन वर्षांत खड्डेमुक्त मुंबई’चे स्वप्न अधुरेच; शिंदे सरकारच्या काळात रस्त्यांची ३० टक्केच कामे पूर्ण
Nitin Gadkari on road safety
Nitin Gadkari : “माझा पाय चार ठिकाणी मोडला होता…” विरोधीपक्षनेते असताना गडकरींसोबत काय घडलं होतं? गडकरी म्हणाले, “लोकांना…”
There should be no political interference in municipal programs says MLA Sneha Dubey Pandit in vasai
आमदार स्नेहा दुबे पंडित यांचा बविआला पहिला धक्का; “कार्यक्रमात राजकीय हस्तक्षेप नको”, पालिका अधिकार्‍यांना ताकीद
Rahul and Priyanka Gandhi stopped by police at Ghazipur
संभल’वरून आरोपांची चिखलफेक; राहुल गांधींचा ताफा गाझीपूर वेशीवर रोखला

हेही वाचा… पुण्यात माणसांपेक्षा गाड्या जास्त! शहरातील वाहनसंख्येत दरवर्षी तीन लाखांची भर

पळणाऱ्या एका गुंडाला वळवी यांनी पकडले. वळवी यांच्या आवाजात धाक होत असल्याने गुंडांनी घाबरून पळ काढला. गुंडाची ओळख पटावी म्हणून त्यांनी मोबाइलवर चित्रीकरण केले. त्यांनी त्वरीत या घटनेची माहिती पाेलीस ठाण्यात, तसेच पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला (कंट्रोल रुम) दिली. पोलिसांनी पसार झालेल्या गुंडांना घटना घडल्यानंतर २० मिनिटात पकडले.

याप्रकरणी पोलिसांनी अनुज जितेंद्र यादव (वय १९), हरिकेश टूणटूण चव्हाण (वय १८), आकाश भारत पवार (वय २३), अमोल वसंत चौरघडे, संदेश सुधीर कांबळे (सर्व रा. वडगाव शेरी) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस हवालदार सीमा वळवी कामावरुन घरी निघाल्या होत्या. भररस्त्यात गुंडांनी कोयते उगारुन तरुणांना मारहाण केल्याचा प्रकार त्यांनी पाहिला. त्यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. वीस मिनिटांत पसार झालेल्या आरोपींनी पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. – राजेंद्र लांडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर

पोलीस आयुक्तांकडून हवालदार वळवींचा सत्कार

कोयता गँगला भिडणाऱ्या पोलीस हवालदार सीमा व‌ळवी यांचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कौतुक केले. वळवी यांचा पोलीस आयुक्तालयात रितेश कुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, रंजनकुमार शर्मा, उपायुक्त अमोल झेंडे, संभाजी कदम, शशिकांत बोराटे, पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, मनीषा पाटील उपस्थित होते. गेल्या वर्षी सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरात कोयते उगारुन दहशत माजविणाऱ्या गुंडांना पोलिसांनी चाेप दिला होता. या घटनेची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित झाल्यानंतर गुंडांना चोप देणाऱ्या पोलिसांचे कौतुक केले होते.

Story img Loader