पुणे : औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध (आयटीआय) येथे झालेल्या प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी, रोजगार भरती मेळाव्यात विविध कंपन्याकडून ८०३ उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यात १२१ महिला उमेदवारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण ४५ आस्थापनांनी मेळाव्यात सहभाग घेतला. शिकाऊ उमेदवारी भरतीकरीता आयटीआय उत्तीर्ण, तसेच इतर शाखेतील एकूण ८३७ उमेदवारांनी मेळाव्यासाठी नोंदणी केली होती.

हेही वाचा <<< अधिकार नसतानाही अन्य विभागांकडून अनाथ प्रमाणपत्रांचे वितरण

हेही वाचा <<< पदभरती परीक्षांतील प्राधान्य क्रमवारीच्या निकषांत एमपीएससीकडून बदल

आस्थापनांच्या मनुष्‍यबळ विकास विभागाकडून ८३७ पैकी ८०३ विद्यार्थ्यांची मुलाखतीद्वारे निवड करण्यात आली. त्यात फिटर, इलेक्ट्रिशिअन, टर्नर, मेकॅनिक मोटर व्हेईकल, मशिनिस्ट आणि संगणक या पदांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे १२१ महिला उमेदवार पैकी ९६ महिला उमेदवारांची प्रामुख्याने सुईंग टेक्नोलॉजी, फॅशन टेक्नॉलॉजी, संगणक परिचालक या पदासाठी निवड करण्यात आली. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानंतर मेळावा आयोजित झाल्याने राज्यभरातून प्रतिसात मिळाल्याची माहिती औंध आयटीआयचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बी. आर. शिंपले यांनी दिली.

Story img Loader