पुणे: पंकजा मुंडे यांना बीआरएस, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष यांच्याकडून पक्षात येण्यासाठी ऑफर दिली आहे. परंतु, त्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या असून त्या कधीच भाजपाला सोडून दुसऱ्या पक्षात जाणार नाहीत. त्या भाजपाच्या सच्चा नेत्या असल्याचं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. ते पुण्याच्या मावळमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मावळमध्ये मोदी@९ महाजनसंपर्क मेळाव्यानिमित्त दानवे आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रावसाहेब दानवे म्हणाले, पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. गोपीनाथ मुंडे आणि मी भाजपचे फाउंडर मेंम्बर होतो. पुढे ते म्हणाले, बीआरएस नाही तर राष्ट्रवादी, काँग्रेस ने देखील त्यांना ऑफर दिली आहे. पण त्या सच्चा भाजपच्या जेष्ठ नेत्या आहेत. त्या कुठेही जाणार नाहीत. योग्य मानसन्मान त्यांना भाजपमध्ये दिला जातो.

आणखी वाचा-मोदींना बॉस म्हणतात…! चीनमध्ये मोदींना बघण्यासाठी नागरिकांनी सुट्ट्या घेतल्या- रावसाहेब दानवे

ठाकरे व्हाट्सएप चॅटिंगवर बोलताना पुढे म्हणाले, त्यांच्या मुलाने इतका मोठा गुन्हा केला तर पुढे काहीतरी अजून मोठं बाहेर येईल. आमच्याकडून असे काही गुन्हे घडत नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना काही मिळणार नाही आणि त्यांना काही मिळाले असेल तर त्यांनी ते उघड करावे असे थेट आव्हान दानवे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior bjp leader pankaja munde will not go anywhere raosaheb danve reaction kjp 91 mrj