सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ज्ञानेश्वर गणपतराव डोके (वय ८५,रा. भाग्यतारा सोसायटी, कात्रज-कोंढवा रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. डोके यांचा मुलगा मुकेश (वय ५०) यांनी या संदर्भात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रक (मिक्सर) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकीस्वार ज्ञानेश्वर डोके हे दुपारी बाराच्या सुमारास कात्रज भाजी मंडईकडून कात्रज चौकाकडे निघाले होते. त्यावेळी सिमेंट वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीस्वार डोके यांना धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पसार झालेल्या ट्रकचालकाचा शोध घेण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात तपास करत आहेत.