पुणे : एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना रास्ता पेठेत घडली. याप्रकरणी एसटी बसचालकाविरुद्ध समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला.व्यंकट रामण (वय ७४, रा. वैष्णवी अपार्टमेंट, रास्ता पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी एसटी बसचालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत व्यंकट रामण यांचे भाऊ अरुणकुमार (वय ६९) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यंकट रामण आणि त्यांचा भाऊ अरुणकुमार गुरुवारी (२३ जानेवारी) दुपारी चारच्या सुमारास रास्ता पेठेतील नेहरु रस्त्याने निघाले होते. सार्थक स्क्वेअर इमारतीसमोर रस्ता ओलांडताना व्यंकट रामण यांना एसटी बसने धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यंकट रामण यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील तपास करत आहेत.
एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
व्यंकट रामण (वय ७४, रा. वैष्णवी अपार्टमेंट, रास्ता पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी एसटी बसचालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे
Written by लोकसत्ता टीम

First published on: 25-01-2025 at 16:15 IST | © The Indian Express (P) Ltd
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior citizen dies in st bus accident pune print news rbk 25 zws