पुणे : रेल्वेच्या बनावट संकेतस्थळाच्या माध्यमातून सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यातून साडेतीन लाख रुपये लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक ओैंध भागात राहायला आहेत. ज्येष्ठ नागरिकाने रेल्वे तिकीट संकेतस्थळावरुन आरक्षित केेले होते. त्यानंतर त्यांचा प्रवासाचा बेत रद्द झाला. त्यामुळे त्यांनी रेल्वेचे तिकीट रद्द करण्यासाठी संकेतस्थळाचा शोध घेतला. त्यावेळी त्यांना आयआरसीटीसीच्या अनेक संकेतस्थळे आढळून आली. त्यापैकी एक संकेतस्थळ त्यांनी उघडले. संकेतस्थळ उघडताच त्यांच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे : रेल्वेद्वारे जनऔषधींचा जागर ; पुणे-दानापूर एक्स्प्रेसच्या डब्यांवर योजनेचे महत्त्व सांगणारा मजकूर

चोरट्यांनी त्यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा ज्येष्ठ नागरिकाने चोरट्यांना तिकिट रद्द करायचे असल्याचे सांगितले. चोरट्यांनी त्यांना एक लिंक पाठविली. लिंकमधील फॉर्म भरुन पाठवा, असे चोरट्यांनी त्यांना सांगितले. ज्येष्ठ नागरिकाने बँक खात्याची गोपनीय माहिती भरुन दिली होती. चोरट्यांनी या माहितीचा गैरवापर करुन ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून साडेतीन लाख रुपये लांबविले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior citizen duped for 3 5 lakh lakhs through fake irctc website pune print news rbk 25 zws