लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मोबाइल संच चोरट्याने चोरून नेल्याची घटना केळकर रस्त्यावरील नारायण पेठ पोलीस चौकीसमोर घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

तक्रारदार नारायण पेठेतील एका सोसायटीत राहायला आहेत. दोन दिवसांपूर्वी ते रात्री पावणेअकराच्या सुमारास जेवण करुन फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले. चोरट्याने नारायण पेठ पोलीस चौकीजवळ तक्रारदाराचा मोबाइल संच चोरून नेला. मोबाइल चोरणाऱ्या चोरट्याचे वय अंदाजे २० ते २२ वर्ष आहे. मोबाइल चोरल्यानंतर चोरटा पळून गेल्याचे ज्येष्ठाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी वाचा-पुणे : मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र कचऱ्याच्या विळख्यात

शहर, तसेच उपनगरात गेल्या काही महिन्यांपासून पादचारी नागरिकांकडील मोबाइल संच, तसेच दागिने चोरुन नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरात मोबाइल चोरीच्या दररोज दोन ते तीन घटना घडतात. मोबाइल चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे. मोबाइल चोरीसह पीएमपी प्रवासी महिलांकडील दागिने चोरीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. मोबाइल चोरल्यानंतर ते परत मिळण्याची शाश्वती नसते. चोरलेल्या मोबाइल संचात तांत्रिफ फेरफार करुन त्याची परराज्यात विक्री केली जाते.

Story img Loader