Pune DRDO Director Arrested By ATS : पुण्यातली संरक्षण संशोधन संस्था अर्थात DRDO चे संचालक प्रदीप कुरुळाकर यांना ATS ने अटक केली आहे. हनीट्रॅपमध्ये अडकून गोपनीय माहिती पाकिस्तानला दिल्याच्या संशयातून ही कारवाई करण्यात आली आहे. एटीएसने त्यांच्यावर मुंबईत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पुणे पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रदीप कुराळकर हे रिसर्च अँड डेव्हलपमेंट (इंजिनिअर्स) या विभागात काम करतात. प्रदीप कुरुळकर हनी ट्रॅपमधे अडकून पाकिस्तानमधील गुप्तचर संस्थांसोबत व्हिडीओ चॅट आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असल्याचे फेब्रुवारी महिन्यात भारतीय गुप्तचर संस्थांना लक्षात आले होते. त्यानंतर यासंबंधीची माहिती DRDO ला देण्यात आली. DRDO च्या व्हिजिलन्स विभागाने या प्रकरणाचा तपास केला आणि एक अहवाल तयार केला. या अहवालाच्या प्रती विविध भारतीय तपास यंत्रणांना देण्यात आल्या.

या अहवालाची प्रत मिळाल्यानंतर महाराष्ट्र ATS ने या प्रकरणाचा तपास केला आणि डॉक्टर प्रदीप कुरुळकर यांना अटक केली. डॉक्टर प्रदीप कुरुळकर हे या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सेवानिवृत्त होणार होते. मात्र ते पाकिस्तानमधील गुप्तचर संस्थांच्या संपर्कात आल्याच तपास यंत्रणांना आतापर्यंतच्या तपासात आढळून आलं आहे. डॉक्टर प्रदीप कुरुळकर यांनी कोणती संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवली? याचा तपास आता एटीएस कडून केला जातो आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior drdo official held in suspected honey trap case with pakistan links scj