ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ विजय केळकर यांची नवी दिल्ली येथील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे ‘सुप्रतिष्ठ प्राध्यापक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
विजय केळकर यांनी भारत सरकारमध्ये विविध पदांवर काम केले असून देशातील ते एक नामांकित अर्थतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. केंद्रीय अर्थखात्याचे सल्लागार, वित्त आयोगाचे अध्यक्ष, वित्त सचिव आदी पदांवरील त्यांची कामगिरी वाखाणली गेली आहे. भारतातील वित्त धोरणांतील विधायक बदलांचे श्रेय केळकर यांना दिले जाते.
पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी. ई. ही पदवी घेतल्यानंतर केळकर यांनी अमेरिकेतील मिनिसोटा विद्यापीठात ‘अर्थशास्त्र’ विषयातील डॉक्टरेट मिळवली.

 

 

 

Story img Loader