मराठी विश्वकोशाचे निवृत्त विभाग संपादक,ज्येष्ठ इतिहासकार, व्यासंगी लेखक डॉ. सु. र. तथा सुरेश रघुनाथ देशपांडे यांचे पुणे येथे मंगळवारी अल्प  आजाराने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन पुत्र आणि कन्या आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लोकसत्ता’चे वरिष्ठ उपसंपादक हृषिकेश देशपांडे यांचे ते वडील होत. पुणे येथे त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. सु. र. ‘भैयासाहेब’ म्हणून प्रसिद्ध होते.  १९६४ पासून सुमारे ५४ वर्षे त्यांनी मराठी विश्वकोश निर्मितीला वाहून घेतले. या कोशाच्या १ ते २० खंडांत त्यांचे मोलाचे योगदान राहिले. या कामात त्यांनी निवृत्तीनंतरही सहसंपादक, विभाग संपादक ही पदे यशस्वीपणे पेलली. यादव स्क्लप्चर(इंग्रजी), मराठेशाहीचे आधुनिक भाष्यकार, भारतीय गणिका, सरस्वती दर्शन, पेशवेकालीन पुणे आदी १७ पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior historian dr s r deshpande passes away
Show comments