ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रतापराव रामराव उर्फ प्र. रा.अहिरराव (वय ७४) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने काळेवाडी येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे असा परिवार आहे. डॉ. श्याम अहिरराव व सेवाविकास बँकेचे संचालक शेखर अहिरराव यांचे ते वडील होत. िपपरी गावातील स्मशानभूमीत गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता अंत्यविधी होणार आहे.
इतिहास व प्राचीन मंदिरांचे गाढे अभ्यासक म्हणून अहिरराव यांची ओळख होती. त्यांनी देशभरातील विविध भागांतून जुन्या गणेश मूर्तीचे संकलन केले होते. ‘लोकसत्ता’ च्या िपपरी-चिंचवड अंतरंग पुरवणीसाठी त्यांनी प्रदीर्घ काळ लिखाण केले होते. िपपरी पालिकेच्या रौप्यमहोत्सवी वर्षांनिमित्त शहराच्या प्रवासावर आधारित लेख व छायाचित्रांचा समावेश असलेली ‘संस्कृतीच्या पाऊलखुणा’ ही स्मरणिका त्यांनी काढली होती. अहिरराव यांच्या निधनाचे वृत्त समजताच खासदार गजानन बाबर व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा