लावणीलाच आयुष्य वाहून घेतलेल्या ज्येष्ठ कलावती गुलाबबाई संगमनेरकर (वय ९०) यांचे बुधवारी (१४ सप्टेंबर) पुण्यात राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. अगदी बालवयातच त्यांनी लावणी गायन आणि अदाकारीला सुरुवात केली होती. पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. राज्य शासनाच्या विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले होते. त्यांच्या मागे अलका, कल्पना आणि वर्षा या तीन मुली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नगर जिल्ह्यातील संगमनेर हे त्यांचे मूळ गाव होते. मात्र, गेल्या तीन दशकांहून अधिक काळ त्यांचे पुण्यात वास्तव्य होते. दयाराम मोरे आणि शिवडाबाई उर्फ शांताबाई या दाम्पत्याच्या पोटी १९३२ मध्ये गुलाबबाईंचा जन्म झाला. त्यांची आई एक उत्तम तमाशा कलावंत होती. लोककलेचा हा वारसा आपल्या मुलीनेही पुढे चालवावा यासाठी आईने बालवयातच गुलाबबाईंवर लावणीचे संस्कार केले. वयाच्या चौदाव्या वर्षापासून लावणीची अदाकारी, गायन सुरू झाल्यानंतर पुढे गुलाबबाईंनी या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली.

हेही वाचा : पुणे : बाणेर रस्त्यावरील बंगल्यात चोरी ; अडीच लाखांचा ऐवज लंपास

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत त्यांनी कार्यक्रम सादर केले. दिल्लीत महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण यांनी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात गुलाबबाईंना कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली. अजरामर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘राजसा जवळी जरा बसा’ या लावणीवर लता मंगेशकर यांच्या ‘आजोळची गाणी’ या कार्यक्रमात गुलाबबाईंनी अदाकारी केली. ‘एचएमव्ही’ या नामांकित कंपनीसाठी संगीतकार विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुलाबबाईंनी विविध लावण्या गायल्या. त्या आकाशवाणीवरूनही प्रसारित झाल्या. गुलाब, मीरा (धाकट्या भगिनी) संगीत पार्टीने त्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळविली. पुण्यात आर्यभूषण थिएटरमध्येही त्यांनी अनेक कार्यक्रम केले होते.