पुणे : ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. श्रीकांत शिवदे (वय ६४) यांचे बुधवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. अॅड. शिवदे गेल्या वर्षभरापासून कर्करोगावर उपचार घेत होते. बुधवारी सकाळी खासगी रुग्णालयात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अॅड. शिवदे यांनी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. विजयराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली व्यवसाय सुरू केला. खासदार वंदना चव्हाण, अॅड. हर्षद निंबाळकर, अॅड. विराज काकडे, अॅड. विजय सावंत आदी सहकाऱ्यांसमवेत त्यांनी सुरुवातीच्या काळात काम केले. पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. अॅड. शिवदे फौजदारी खटल्यात निष्णात वकील म्हणून नावाजले होते. अभिनेता सलमान खान याच्याकडून मुंबईतील वांद्रे येथे अपघात (हिट अँड रन) झाला होता. या खटल्यात अॅड. शिवदे यांनी खान याची बाजू मांडली होती. हिरे व्यापारी, चित्रपट निर्माते भरत शहा यांच्या विरोधात गुन्हेगारी टोळीशी संबंध असल्याचा गुन्हा दाखल झाला होता. शहा यांच्याकडून अॅड. शिवदे यांनी काम पाहिले होते. दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्याविरोधात करण्यात आलेल्या आरोपातील खटल्यात त्यांनी त्यांची बाजू मांडली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा