नारायणगाव : गेल्या चार दशकांपासून ग्रामीण भागात कार्यरत असलेले ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डाॅ. मनोहर कृष्ण डोळे (वय ९७) यांचे शुक्रवारी नारायणगाव येथे वृद्धापकाळाने निवासस्थानी निधन झाले. नेत्रसेवेच्या क्षेत्रातील कार्याबद्दल डाॅ. डोळे यांचा ‘पद्मश्री’ किताबाने गौरव करण्यात आला होता.  त्यांच्यामागे डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. संजीव डोळे, डॉ. संदीप डोळे हे दोन मुलगे आणि कन्या डॉ. स्वाती दीक्षित असा परिवार आहे. डाॅ. डोळे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी नारायणगांव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून डाॅ. डोळे यांना मानवंदना दिली.

शहरातील सुविधांपासून दूर राहण्याचा निर्णय घेत डाॅ. मनोहर डोळे ४० वर्षांपूर्वी नारायणगाव येथे स्थायीक झाले होते. तेथे त्यांनी मोहन ठुसे नेत्र रुग्णालयाची स्थापना केली. त्याकाळी आदिवासी व दुर्गम भागामध्ये कोणत्याही नेत्रविषयक आरोग्य सेवा उपलब्ध नव्हत्या. अशा काळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सस्थापक डॉ. हेडगेवार आणि गोळवळकर गुरूजी यांच्या प्रेरणेने हजारो मोफत नेत्र तपासणी शिबिरे त्यांनी घेतली. दोन लाखाहून अधिक रुग्णांवर त्यांनी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या.  

2 killed as auto overturn in khed taluka
मरकळ येथे रिक्षा उलटून दोघांचा मृत्यू
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
new ST buses in phased manner 110 buses have been made available
जेजुरी बसस्थानकात चालकाचा हृदयविकाराने मृत्यू
36 year old man from Pimplegurav died due to GBS complications and pneumonia
पिंपरी : ‘जीबीएस’मुळे युवकाचा मृत्यू
mahakumbh vip arrangement
Mahakumbh: चेंगराचेंगरीत सामान्य भाविकांचा मृत्यू; दुसरीकडे VIP साठी विशेष व्यवस्था, इन्फ्लूएन्सरच्या व्हिडीओवर संताप
Marotrao Gadkari passed away, Senior Gandhian thinker, Marotrao Gadkari , Marotrao Gadkari news,
ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत मा. म. गडकरी यांचे निधन, विनोबाजींच्या भूदानयज्ञात त्यांनी…
GBS , Victim of GBS disease, Solapur, GBS disease ,
सोलापुरात जीबीएस आजाराचा संशयित मृत्यू
senior citizen dies in st bus accident
एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

हेही वाचा >>>Chandrakant Patil : पुण्याचं पालकमंत्रिपद कोणाला मिळणार? चंद्रकांत पाटलांचं मोठं भाष्य; म्हणाले, “माझे वरिष्ठ…”

ग्रामीण आणि दुर्गम क्षेत्रांबरोबरच शहरी भागातही त्यांनी विद्यार्थी, संस्था, ट्रकचालक, रोटरी क्लब यांच्यासाठी नेत्रशिबरे आयोजित केली होती. या कार्याची दखल घेत २०२४ मध्ये डॉ. मनोहर डोळे यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते ‘पद्मश्री’ किताबाने गौरविण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी डाॅ. डोळे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Story img Loader