छत्रपती संभाजी महाराज हे सर्वार्थाने शूरवीर होते. ते स्वराज्यरक्षकही होते आणि धर्मवीरदेखील होते, हे आपण मान्य केले पाहिजे. राजकारण्यांनी त्यांच्याबद्दल घातलेला वाद चुकीचा आहे’, असे मत मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी व्यक्त केले.
हेही वाचा- मुंबईत आणखी तीन दिवस थंडीचा मुक्काम; उत्तरेकडील थंडीच्या लाटेमुळे संपूर्ण महाराष्ट्राला हुडहुडी
राफ्टर पब्लिकेशन्स आणि इतिहास सांस्कृतिक कट्टा यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात संदीप परांजपे लिखित ‘भारतात आलेले परकीय प्रवासी’ या पुस्तकाचे प्रकाशन डाॅ. देगलूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. इतिहास अभ्यासक मंदार लवाटे आणि प्रकाशक उमेश जोशी यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा- लाखभरांच्या उपस्थितीने जॉर्जियन कुस्ती मार्गदर्शक भारावले
देगलूरकर म्हणाले, प्राचीन काळापासून येथे आलेल्या परदेशी पर्यटकांनी भारताबद्दल विपुल लेखन केले. परंतु, त्यांनी लिहिलेली प्रत्येक गोष्ट सर्वांगाने योग्यच आहे, असे मान्य करणे चुकीचे आहे. या साहित्याचा सखोल अभ्यास गरजेचा आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून परदेशी लेखकांचा भारताकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन समोर येऊ शकेल, असे परांजपे यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले.