पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात आलिशान कारने १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने दोघा तरुणांना चिरडल्याची घटना घडली होती. ही घटना थांबत नाही तोवर पुन्हा एकदा कोंढवा परिसरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने पाण्याचा टँकर चालवित व्यायामासाठी निघालेल्या एक महिला आणि मुलीला उडविल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अल्पवयीन मुलास आणि टँकर मालक महिंद्रा बोराटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथील एनआयबीएम रोडवरील कोंढवा एवर जॉय सोसायटी समोरून गीता संतोष धुमे या त्यांच्या कुस्ती अकॅडमी मधील विद्यार्थ्यांसोबत आज सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास प्रॅक्टिस करीत जात होत्या.

हेही वाचा…बीबीए, बीसीए पुरवणी प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी कधी?

त्यावेळी दुचाकीवर असलेल्या गीता संतोष धुमे आणि रस्त्यावरुन धावत चाललेल्या सोनी चंद्रसिंग राठोड यांना मागून टँकरने जोरात धडक दिली. त्या घटनेत दोघी जखमी झाल्या असून त्यांना जवळील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.तर अल्पवयीन मुलास आणि टँकर मालक महिंद्रा बोराटे यांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याच कोंढवा पोलिसांनी सांगितले.