लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: डॉक्टर महिलेला धमकावून सायबर चोरट्यांनी २१ हजार रुपये लुबाडल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत डॉक्टर महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
minister abdul sattar Attempt to grab industrial plots
शिक्षण संस्थेच्या नावाखाली औद्योगिक भूखंडावर डोळा, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या खेळीस अधिकाऱ्यांच्या सजगतेमुळे चाप
sarpanch viral video | Wife caught husband with girlfriend
सरपंचाचं लफडं बायकोनं पकडलं; नवऱ्याबरोबर कारमधून फिरणाऱ्या गर्लफ्रेंडची केली अशी अवस्था की…; VIDEO झाला व्हायरल
stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब
pimpri chinchwad cyber police busted gang operating through China, Nepal crime news
चीन, नेपाळमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

तक्रारदार डॉक्टर महिला पुणे-सातारा रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात आहे. रुग्णालयातील शिशू अतिदक्षता विभागात त्या नियुक्तीस आहेत. अतिदक्षता विभागात त्यांच्या मोबाइल क्रमांकावर एका तरुणीने संपर्क साधला. तरुणीने समाजमाध्यमातील सुविधेचा वापर करुन डॉक्टर महिलेला अश्लील चित्रफीत पाठविली. त्यानंतर सायबर चोरट्यांनी स्क्रिनशॉट काढून डॉक्टर महिलेला पाठविले.

आणखी वाचा- बनावट निकाहनामा तयार करुन तरुणीची बदनामी, पसार आरोपीला बुलढाण्यात पकडले

चोरट्यांनी महिलेला धमकावण्यास सुरुवात केली. स्क्रिनशॉट समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी चोरट्यांनी दिली आणि त्वरित ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठविण्यास सांगितले. घाबरलेल्या डॉक्टर महिलेने ऑनलाइन पद्धतीने २१ हजार रुपये जमा केले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक सावंत तपास करत आहेत.