पुणे: पुणेरी मेट्रोचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) सुरू आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील या मेट्रोच्या स्थानकांना काही ठिकाणी वाहनतळासाठी जागा मिळत नसल्याने कोंडी झाली होती. यावर पीएमआरडीएने महापालिकेकडे आरक्षित भूखंडांची मागणी केली होती. महापालिकेने मेट्रो स्थानकांच्य़ा १०० ते ४०० मीटर अंतरातील आठ भूखंड देण्याची तयारी दर्शविली असून, त्यावर लवकरच अंतिम निर्णय होणार आहे.

पुणेरी मेट्रोची एकूण २३ स्थानके आहेत. त्यांपैकी केवळ माण, बालेवाडी आणि शिवाजीनगर या तीनच स्थानकांना वाहनतळासाठी जागा मिळाली आहे. इतर स्थानकांना वाहनतळासाठी जागा मिळत नसल्याने पीएमआरडीएने अखेर महापालिकेकडे धाव घेतली. याबाबत पीएमआरडीएने मागील महिन्यात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना पत्र पाठविले. त्यात बाणेर आणि बालेवाडी परिसरातील आठ आरक्षित भूखंडांची मागणी करण्यात आली आहे. पीएमआरडीएला हे भूखंड मिळाल्यास बालेवाडी क्रीडा संकुल, एनआयसीएमएआर, रामनगर, लक्ष्मीनगर, बालेवाडी फाटा, बाणेरगाव आणि बाणेर या सात मेट्रो स्थानकांना वाहनतळासाठी स्वतंत्र जागा मिळणार आहे.

Infosys Q3 Results Highlight: Net profit rises 11 percent
इन्फोसिसला ६,८०६ कोटींचा तिमाही नफा; ११ टक्क्यांची अपेक्षेपेक्षा सरस वाढ
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Western Railway has clarified that air conditioned local trains will continue to operate from Bhayandar railway station
८:२४,ची लोकल वातानुकूलितच ,आंदोलनानंतरही रेल्वे प्रशासन ठाम
Pune Municipal Corporation decision regarding pink rickshaws pune print news
पुणे: महापालिकेच्या एका निर्णयामुळे शहरात वाढणार गुलाबी रिक्षांची संख्या !
Sudhir Mehta expressed his opinion regarding Pune Airport Pune news
‘पुणे विमानतळाचा व्यावसायिकदृष्ट्या विस्तार महत्त्वाचा’,कोणी केली मागणी ?
Traffic police and Municipal Corporation are trying to speed up traffic in Pune news
वाहतूक मंदीत मिनिटभराने सुधारणा! उपाययोजनांमुळे गती वाढल्याचा पुणे पोलिसांचा दावा
Athavale claim chairman of trust running Siddharth college
‘पीपल्स’च्या अध्यक्षपदावर रामदास आठवले यांचा दावा; जुन्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी ५०० कोटींच्या निधीची मागणी
In Jammu And Kashmir, PM Modi Assures All Promises Will Be Fulfilled
सर्व आश्वासने पूर्ण करणार! बोगद्याच्या उद्घाटनानंतर पंतप्रधानांची जम्मूकाश्मीरच्या जनतेला ग्वाही

हेही वाचा… …तर शरद मोहोळ वाचला असता! पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड; कटात सामील न झाल्याने पोळेकरकडून एकावर गोळीबार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधी पीएमआरडीएने मेट्रो स्थानकांच्या वाहनतळासाठी महापालिकेकडे जागा मागितली होती. परंतु, या जागा वेगवेगळ्या ठिकाणी आणि खासगी मालकीच्या होत्या. त्यामुळे महापालिकेने याला नकार दिला होता. त्याऐवजी आरक्षित भूखंड देण्याची तयारी महापालिकेने दर्शवली होती. त्यानंतर पीएमआरडीएने आरक्षित भूखंड शोधून सोईच्या भूखंडांची यादी महापालिकेला दिली आहे. हे सर्व भूखंड सात मेट्रो स्थानकांच्या सुमारे १०० ते ४०० मीटर अंतरावर आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी स्वतंत्र वाहनतळ उभारणे सोईचे ठरणार आहे. यावर महापालिकेकडून लवकरच निर्णय अपेक्षित आहे.

आरक्षित भूखंड समिती शिक्कामोर्तब करणार

पीएमआरडीएने मागितलेले भूखंड हे वेगवेगळ्या कारणांसाठी आरक्षित आहेत. त्यांचा वाहनतळासाठी वापर करावयाचा झाल्यास ते आरक्षण बदलावे लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागाने आरक्षित भूखंड समितीकडे पाठविला आहे. समितीकडून शिक्कामोर्तब झाल्यानंतर हा प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे पाठवला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पीएमआरडीएला आठ भूखंड देण्याचा प्रस्ताव आहे. हे भूखंड ३० वर्षांच्या भाडेकराराने दिले जातील. त्यासाठी वर्षाला रेडीरेकनर दराच्या अडीच टक्के भाडे असेल. भूखंडांचे आरक्षण बदलण्याचा निर्णय झाल्यानंतर आयुक्तांकडून त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल. – राजेंद्र थोरात, उपअभियंता, मालमत्ता विभाग, पुणे महापालिका

पीएमआरडीएने बाणेर आणि बालेवाडी भागातील आठ भूखंड महापालिकेकडे मागितले आहेत. महापालिकेकडून यावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे मेट्रो स्थानकांसाठी स्वतंत्र वाहनतळाची सुविधा उभारण्यासाठी जागा उपलब्ध होणार आहे. – रामदास जगताप, उपायुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

Story img Loader