करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन मुख्य शहरांचा आणि जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्याचे अर्थचक्र फिरवणाऱ्या या दोन महत्वाच्या शहरांमध्ये सर्वाधिक करोना रुग्ण आढळून आलेले. पुण्यामधील रुग्णसंख्या तर मुंबईपेक्षाही जास्त असल्याचं चित्र मध्यंतरी निर्माण झालं होतं. याच पार्श्वभूमीवर पुण्यातीलच सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये तयार होणाऱ्या कोव्हिशिल्ड लसी आधी पुण्यात द्याव्यात अशी मागणी करण्यात आली. मात्र त्यावर काही ठोस निर्णय झाला नाही. तरी यासंदर्भातील एक मोठा खुलासा आता सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांनी केला आहे. पुण्यामध्ये सर्वाधिक करोना रुग्ण असल्याचं अहवालामधून दिसून आल्यानंतर आम्ही पुण्याला सर्वाधिक लसींचा पुरवठा करण्याबद्दल विचारणार केली होती. मात्र केंद्रातील मोदी सरकारने त्यावर काहीच उत्तर दिलं नसल्याचं सायरस पूनावाला म्हणाले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा