पुणे : विद्यापीठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापकांसाठी अनिवार्य असलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेच्या (सेट) तारखेत बदल करण्यात आला आहे. पूर्वीच्या नियोजनानुसार सेट परीक्षा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने नियोजनात बदल करण्यात आला असून, आता सेट परीक्षा १५ जून रोजी ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांनी या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. सेट परीक्षा ४ मे रोजी घेण्याचे विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्याच दिवशी एमपीएससी परीक्षा येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे दोन्ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची गैरसोय होणार असल्याची बाब लक्षात घेऊन सेट परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. सेट परीक्षेची तारीख निश्चित करण्यासाठी सुकाणू समितीची बैठक झाली. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आणि दोन विषयतज्ज्ञांचा समावेश होता.

बैठकीत चर्चा करून १५ जून रोजी परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक, अभ्यासक्रम आणि अन्य माहिती लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. येत्या दहा दिवसांत उमेदवारांकडून परीक्षेसाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार परीक्षेचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून करण्यात येणार आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील पात्र उमेदवारांना ही परीक्षा देता येणार आहे.