शहरात गंभीर अपघातांचे प्रमाण वाढले आहेत. गेल्या दोन दिवसांत शहरातील वेगवेगळ्या भागात झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. मुंबई-पुणे रस्त्यावर पाटील इस्टेट परिसरात टेम्पोच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विशाल हरी वैराट (वय २९, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर, मुंबई-पुणे रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी टेम्पो चालक नवनाथ बबन मिसाळ (वय २५,रा. चिनके, ता. सांगोला, जि. सोलापूर) याला अटक करण्यात आली.

हेही वाचा- पिस्तूल बाळगणारा सराईत गुन्हेगार गजाआड; पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात कारवाई

police registered murder case after body found on mumbai ahmedabad highway
तो अपघात नव्हे तर हत्या; महामार्गावरील अपघाती मृत्यूचे गूढ उकलले
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
Dahanu devotee loksatta news
डहाणू : महालक्ष्मी गडावर गेलेल्या भाविकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
266 people died in road accidents in Raigad in year
रायगडमध्ये वर्षभरात रस्ते अपघातात २६६ जणांचा मृत्यू
One person died, eight injured , vehicle fell in valley,
ठाणे : वाहन दरीत कोसळून एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी
Father Two children dies after truck hits bike
पुणे : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार वडिलांसह दोन शाळकरी मुलांचा मृत्यू; चालकाने मद्यप्राशन केल्याचा संशय
dharashiv three killed in attack marathi news
Dharashiv Crime News : शेतात विहिरीतील पाणी देण्यावरून हाणामारी; तिघांचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

विशालचा भाऊ आकाश (वय ३१) यांनी याबाबत खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार विशाल जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरुन निघाला होता. गांधी वसाहतीसमोर भरघाव टेम्पोने दुचाकीस्वार विशालला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक वालकोळी तपास करत आहेत. नगर रस्ता परिसरात लोणीकंद-मावडी रस्त्यावर भरधाव वाहनाच्या धडकेने पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दुर्गेश बबलू कोल (वय १९, सध्या रा. भावडी, ता. हवेली, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. कोल मूळचा मध्यप्रदेशातील आहे. तो मजुरी करतो. भावडी ते लोणीकंद रस्त्यावरुन तो निघाला होता. त्या वेळी भरधाव वाहनाने कोलला धडक दिली. पसार झालेल्या वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक महादेव लिंगे यांनी या संदर्भात लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा- मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर कारच्या धडकेने महिलेचा मृत्यू

लोणीकंद परिसरातील केसनंद रस्त्यावर आणखी एक अपघात झाला. भरधाव वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. टेक कालू टमट्टा (वय २७, रा. सुखवाणी सोसायटी, बालाजी पार्क, केसनंद रस्ता, वाघोली) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. टेक मूळचा नेपाळचा आहे. तो रखवालदार म्हणून काम करतो. दुचाकीस्वार टेक आणि त्याचा मित्र गणेश थापा हे केसनंद रस्त्याने निघाले होते. त्या वेळी भरधाव वाहनाने दुचाकीस्वार टेकला धडक दिली. अपघातात त्याचा मृत्यू झाला. सहप्रवासी गणेश याला दुखापत झाली. टेक याचे नातेवाईक टंक जमन बहाद्द्रर याने याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शहरात गंभीर स्वरुपाच्या अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्ग, नगर रस्ता, सोलापूर रस्ता परिसरात अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत.

Story img Loader