पुणे : तळजाई आणि सहकारनगर भागात वाहनांची तोडफोड होण्याच्या घटनांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवून सहकारनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक तसेच पोलिस निरीक्षक आणि पाच कर्मचाऱ्यांना पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी गुरुवारी निलंबित केले. या महिन्यात घडलेल्या वाहन तोडफोड घटनांची तक्रार गांभीर्याने न घेणे या पोलिसांना महागात पडले आहे.

सहकारनगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक (सध्या नेमणूक नियंत्रण कक्ष) सावळाराम साळगावकर, पोलीस निरीक्षक मनोज शेंडगे, सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे, पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी आणि मारुती वाघमारे, हवालदार संदीप पोटकुले, विनायक जांभळे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. कर्तव्य गांभीर्याने आणि जबाबदारीने पार पडले नसल्याने शासकीय सेवेतून निलंबित करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.  

Six Bangladeshi infiltrators arrested from Mahad
महाड येथून सहा बांग्लादेशी घुसखोरांना अटक
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Amravati jat panchayat social boycott
धक्कादायक! जात पंचायतीच्या आदेश झुगारला म्हणून सामाजिक बहिष्कार
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : ‘पुण्यात ७ दुकानं, १५ कोटींचा संपूर्ण मजला…’, आमदार सुरेश धसांचा ‘आका’कडील संपत्तीबाबत मोठा दावा
Suresh Dhas , Walmik Karad, Amol Mitkari allegation ,
अकोला : सुरेश धस वाल्मीक कराडच्या संपर्कात होते, मिटकरींच्या आरोपाने खळबळ
Pune, girl call center was attacked, yerawada area
पुणे : कॉलसेंटरमधील तरुणीवर सहकाऱ्याकडून कोयत्याने हल्ला, येरवडा भागातील घटना; हल्लेखोर ताब्यात
deccan police registered case against four including woman for allegedly assaulting anti encroachment squad
फर्ग्युसन रस्त्यावर अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की; महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा
Relief for police transferred to Mumbai 7 police officers back in Vasai and Bhayander
मुंबईत बदल्या झालेल्या पोलिसांना दिलासा; ७ पोलीस अधिकारी पुन्हा वसई, भाईंदरमध्ये

हेही वाचा >>>“मला काळजी एका गोष्टीची आहे की, शीख धर्मात…”, समान नागरी कायद्यावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य

अरण्येश्वर भागात टोळक्याने दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री दहा ते पंधरा वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केली होती. तोडफोड करणाऱ्या गुंडांनी घरांवर दगडफेक केल्याने घबराट उडाली होती. गेल्या आठवड्यात तळजाई पठार परिसरात सराईत गुंड आणि साथीदारांनी २६ वाहनांची तोडफोड केली होती. टोळक्याने सहकारनगर भागात भररस्त्यात तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, साळगावकर यांची पोलीस नियंत्रण कक्षात दोन दिवसांपूर्वी बदली करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच त्यांच्या निलंबनाचे आदेश आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. साळगावकर यांच्या विरोधात अनेक तक्रारी पोलीस आयुक्तांकडे करण्यात आल्या होत्या.

Story img Loader