पुणे: ‘लोकल शॉप्स ऑन ॲमेझॉन’ या कार्यक्रमात किरकोळ विक्रेत्यांना सहभागी करुन घेतले जात आहे. यामध्ये राज्यातील ३५ हजार विक्रेते आतापर्यंत सहभागी झाले असून, त्यात पुण्यातील ७ हजार विक्रेत्यांचा समावेश आहे.
अॅमेझॉनकडून या कार्यक्रमाची सुरुवात २०२० मध्ये करण्यात झाली. आता हा कार्यक्रम ३४४ शहरातील ३ लाखांहून अधिक किरकोल विक्रेत्यांपर्यंत पोहोचला आहे. राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, सातारा आणि नाशिक या प्रमुख शहरांमध्ये ‘लोकल शॉप्स ऑन ॲमेझॉन’चे जाळे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. महाराष्ट्रातील ३५ हजारांहून अधिक दुकानदारांनी या योजनेत सहभाग घेतला आहे, अशी माहिती अॅमेझॉन इंडियाच्या लोकल शॉप्स विभागाचे प्रमुख अभिषेक जैन यांनी दिली.
हेही वाचा… ब्रँण्डेड कपडे मागवले आणि हाती आल्या चिंध्या
या कार्यक्रमामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या विक्रेत्यांकडून किचन, कपडे, किराणा, इलेक्ट्रॉनिक्स, मेजर अप्लायन्सेस, होम आणि फर्निचर अशा विविध वर्गातील उत्पादने मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागली आहेत. आता सणासुदीचा काळ सुरू झाला आहे. त्यामुळे वस्तूंना, उत्पादनांना वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांना आपला व्यवसाय ऑनलाइन पद्धतीने वाढवण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे, असे जैन यांनी नमूद केले.