पुणे : मल्टिसिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोमसारखी लक्षणे आणि गंभीर श्वसनविषयक परिस्थितीवर सात वर्षांच्या मुलाने मात केली आहे. करोना संसर्गानंतर मल्टिसिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम ही दुर्मिळ गुंतागुंत त्याच्या शरीरात निर्माण झाली होती. आता त्या मुलाच्या प्रकृतीत सुधारणा झालेली आहे.
या मुलाला सुरुवातीला ताप, पुरळ, पोटात दुखणे आणि जलद श्वासोच्छ्वासाचा त्रास जाणवत होता. त्याला हडपसरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याचा रक्तदाबही खूप कमी झाला होता. त्याला प्रचंड अशक्तपणा आणि रक्तपेशींची संख्याही कमी होती. त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करून डेंग्यू आणि विषमज्वराची चाचणी करण्यात आली. मात्र, चाचणीत कोणतेही नेमके कारण समोर आले नाही. नंतर त्याला मल्टिसिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोमचे निदान झाले.
हेही वाचा >>> ससून रूग्णालयात आणखी एक घोटाळा : शिक्के चोरून बनविली बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रे
वैद्यकीय पथकाने मुलाला व्हेंटिलेटरवर ठेवून औषधेपचार सुरू केले. रुग्णाची प्रकृती अधिक बिघडली असल्यामुळे स्टेरॉईड आणि इंट्राव्हेनस इम्युनोग्लोब्युलिन देण्यात आले. अतिदक्षता विभागात १० दिवसांच्या उपचारानंतर त्याची ऑक्सिजन पातळी सामान्य झाली. दोन आठवड्यांच्या उपचारानंतर बरे झालेल्या मुलाला अखेर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
या मुलामध्ये विविध प्रकारची लक्षणे दिसत असल्यामुळे वेगळेच आव्हान निर्माण झाले होते. फुफ्फुसाच्या जळजळीमुळे त्याला तीव्र श्वसनाचा त्रास होत होता. पहिल्या ४८ तासांनंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली.
– डॉ. गणेश बडगे, बालरोगतज्ज्ञ