पुणे : शहरातील अनेक रस्त्यांवर सांडपाणी आणि पावसाळी वाहिन्यांची झाकणे रस्त्याला समतल नसल्याने अशी झाकणे असलेल्या काही रस्त्यांवर खड्डे, तर काही रस्त्यांवर उंचवटे निर्माण झाले आहेत. वाहनचालकांना याचा त्रास होत असून, काही भागांत यामुळे अपघातदेखील झाले आहेत.

शहरात तब्बल १६०० किलोमीटरचे रस्ते असून, दर वर्षी महापालिकेच्या पथ विभागाकडून विविध कारणांसाठी या रस्त्यांची दुरुस्ती केली जाते. शहरात जलवाहिनी, सांडपाणीवाहिनी, तसेच एमएनजीएलची वाहिनी व केबल टाकण्यासाठी रस्त्यांची खोदाई केली जाते, तर काही भागांत नवीन रस्ते तयार करताना जुने रस्ते खोदले जातात. यासाठी महापालिका दर वर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते.

Municipal Corporation takes action against 71 unauthorized stalls in Kolhapur news
कोल्हापुरात अतिक्रमण विरोधी मोहीम
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Garbage collection, pune , Garbage collection night ,
पुणे शहरात आता रात्रीही होणार कचरासंकलन, हे आहे कारण ?
Chandrakant Patil instructs forest officials to ensure safety of hills in Pune
पुणे शहरातील टेकड्याच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करा, वन अधिकार्‍यांना चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
Aatkoli dumping ground Thane corporation FIR registered
ठाणे पालिकेच्या आतकोली कचराभुमीवर दगडांसह पाण्याची चोरी, पालिका प्रशासनाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
Mumbai national park encroachment loksatta news
राष्ट्रीय उद्यान लुप्त होईल… अतिक्रमणांवर कारवाई न केल्यावरून उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
pune municipal corporation will take action against banners
पिंपरी : फलकांद्वारे शहर विद्रूप केल्यास आता दंडात्मक कारवाई, महापालिका आयुक्तांचा आदेश; प्रभागनिहाय नागरिकांची समिती

हेही वाचा – तबल्याचा ठेका अन् रसिकाग्रणी काका!

रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदारांमार्फत शेकडो कोटी रुपयांचा निधी खर्च केला जातो. जुन्या रस्त्यांची दुरुस्ती करताना सांडपाणी वाहिन्यांची झाकणे एक तर खाली जातात किंवा रस्त्याच्या उंचीपेक्षा वर येतात. रस्ते दुरुस्तीची कामे करताना अनेकदा झाकणांची उंची कमी न करता ठेकेदारांकडून तसाच रस्ता तयार केला जातो. यामुळे शहरातील अनेक भागांत ‘सांडपाणी वाहिन्यांची झाकणे खाली आणि रस्ता वर’ असे चित्र पाहायला मिळत आहे.

ठेकेदारांनी काम केल्यानंतर, झालेले काम योग्य आहे, की अयोग्य हे पाहण्याची जबाबदारी महापालिकेच्या पथ विभागातील अधिकाऱ्यांची असते. मात्र, तसे घडते की नाही असा प्रश्न पडावा, अशी स्थिती आहे. कारण, अनेक वाहने अशा खड्ड्यांमध्ये आदळतात आणि अपघातांचे प्रकार घडतात. यामध्ये वाहनचालकासह संबधित वाहनांचेही मोठे नुकसान होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत.

शहरातील रस्त्यांवर मध्यभागीच सांडपाणी वाहिन्यांची कामे करण्यात आली आहेत. काही ठिकाणी ही झाकणे सिमेंट काँक्रिटची, तर काही ठिकाणी लोखंडी आहेत. रस्त्याच्या उंचीच्या तुलनेत कमी-अधिक उंचीवर असल्याने वाहने चालविताना त्रास सहन करावा लागतो. रस्त्यामध्ये खाली-वर असलेल्या झाकणांमुळे झटका बसतो आणि पाठदुखी, मानदुखी होते, अशी तक्रार नोकरदार असलेल्या रवींद्र पवार यांनी केली.

हेही वाचा – राज्यात प्रथमच पुण्यात होणार ‘हा’ प्रयोग! बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाने घेतला पुढाकार

रस्त्यापेक्षा उंच किंवा खाली गेलेल्या सांडपाणी वाहिन्यांच्या झाकणांमुळे अपघात होण्याची शक्यता असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. शहरातील सर्व भागांतील झाकणांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्याची दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे. हे काम १५ जानेवारीपर्यंत पूर्ण होईल, असे पुणे महानगरपालिकेचे पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

ही आहे स्थिती

  • पावसाळी गटारांची झाकणे तुटलेल्या अवस्थेत.
  • रस्त्याच्या उंचीपेक्षा अधिक उंचीमुळे वाहने चालविताना कसरत.
  • काही भागांतील झाकणेच गायब.
  • रस्त्याचे काम करताना झाकणांवरच रस्ता केल्याने झाकणे रस्त्याच्या खाली.
  • ठेकेदाराची घाई आणि महापालिकेचे दुर्लक्ष.
  • मध्यवर्ती भागातील पेठांसह उपनगरातील रस्त्यांवरदेखील अशीच स्थिती.

कोणत्या भागांत त्रास?

  • सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी जवळील रस्त्यावरील सांडपाणी वाहिनीची लोखंडी जाळी तुटली आहे.
  • लोकमान्यनगर, धनकवडी, चव्हाणनगर, पद्मावती, अरण्येश्वर, पर्वती परिसर, शिवदर्शन, बाजीराव रस्ता, सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ अशा विविध भागांत सांडपाणी वाहिन्यांवरील झाकणे खराब झाली आहेत.

Story img Loader