हडपसर ते दिवेघाट या दरम्यान पावसाळ्यात दोन वेळा ढगफुटीसदृश्य पाऊस पडला. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांनी रस्त्याच्या पातळीपेक्षा वर बांधकामे केली आहेत. त्यामुळे या ठिकाणी सांडपाणी रस्त्यावर येत असल्यामुळे पावसाच्या काळात रस्त्यावर खड्डे पडले होते, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी विधिमंडळात दिली. हडपसर-सासवड या राष्ट्रीय महामार्गाच्या हडपसर ते दिवघाट या टप्प्यातील महामार्गाची दूरवस्था झाली आहे. परिणामी या ठिकाणी वाहतुककोंडी होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

हेही वाचा >>> पुणे: खडकवासला धरणात तरुण आणि तरुणीचा तरंगताना आढळला मृतदेह

या रस्त्याच्या दुरूस्तीच्या मागणीकरिता स्थानिक नागरिकांनी चालू वर्षी आॉक्टोबर महिन्यात आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की हडपसर ते दिवेघाट या टप्प्यातील महामार्गाची दूरवस्था झाल्याने वाहतुककोंडी होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी स्थानिकांनी आंदोलन केल्याची बाब खरी आहे.

हेही वाचा >>> पुणे: सिंहगड रस्त्यावर चोरट्यांची टोळी गजाआड

मोहोळ-पंढरपूर-आळंदी या राष्ट्रीय महामार्गाचे काम केंद्र शासनाच्या अखत्यारित असून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून (नॅशनल हायवेज ॲथॉरिटी ऑफ इंडिया – एनएचएआय) प्रगतीपथावर आहे. या महामार्गावरील हडपसर ते दिवेघाट या लांबीमध्ये जून ते ऑक्टोबर या कालावधीत दोन वेळा ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. पावसाचे प्रमाण नेहमीपेक्षा जास्त असल्यामुळे, तसेच स्थानिक व्यावसायिकांनी रस्त्याच्या पातळीपेक्षा सर्व बांधकामे वर बांधली आहेत. त्याचे सांडपाणी रस्त्यावर येतत्सल्यामुळे पावसाच्या काळात काही खड्डे पडले होते. हे खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीस योग्य ठेवण्यात येत होता. पाऊस संपल्यानंतर या रस्त्याचे मजबुतीकरण करून आवश्यक त्या ठिकाणी रस्त्याचे नुतनीकरण करण्यात येत आहे.

Story img Loader