पुणे : कोरेगाव पार्क भागातील मसाज सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत मसाज सेंटरमधून चार परदेशी महिलांसह सात जणींना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी मसाज सेंटरच्या चालकांच्या विरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुणे स्टेशन परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू

कोरेगाव पार्क भागातील साऊथ मेन रस्त्यावरील एका सोसायटीत द सिग्नेचर थाई स्पा या मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू होता. मसाज सेंटरमध्ये परदेशी महिला असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून शहानिशा केली आणि मसाज सेंटरवर छापा टाकला.

हेही वाचा >>> गडचिरोलीमधील भाजपचे नेते वासुदेव बट्टे यांच्या मुलीची पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या, नैराश्यातून आत्महत्या केल्याची  शक्यता

पोलिसांनी थायलंडमधील चार महिलांसह सात जणींना ताब्यात घेतले. मसाज सेंटरचा व्यवस्थापक उत्तम शेषराव सोनकांबळे (वय ३८ रा. खराडी) आणि चालक गजानन दत्तात्रय आडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सोनकांबळेला अटक करण्यात आली आहे. मसाज सेंटरमधील महिला आणि व्यवस्थापक आडे यांना कोरेगाव पार्क पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, मनीषा पुकाळे, तुषार भिवरकर, रेश्मा कंक आदींनी ही कारवाई केली.