पिंपरी-चिंचवडच्या पिंपळे निलख येथे राहणाऱ्या १२ वर्षीय मुलीसोबत दोघांनी चालत्या टेम्पोत अश्लील कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी शौकत अजमेर शेख आणि अमोल चंद्रकांत इंगवले यांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी शाळेत सोडण्याचा बहाणा करत पीडित १२ वर्षीय मुलीशी जवळीक साधत अश्लील कृत्य केले. दरम्यान, पीडित मुलीने आईला सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. सांगवी पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली.

सविस्तर माहिती अशी की, पीडित १२ वर्षीय मुलगी औंध येथील शाळेत शिकते. तिचा भाऊ आणि चुलत बहीण देखील त्याच शाळेत आहेत. गुरुवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या पीडित मुलगी भावासोबत शाळेत जात असताना आरोपीने त्यांच्या आईला दोघांना शाळेत सोडतो असं सांगितलं. आरोपीने लहान भावाला शाळेत सोडले आणि मुलीला घेऊन शनिवार वाड्याच्या दिशेने निघून गेला. रस्त्यात टेम्पो थांबवत अमोल चंद्रकांत इंगवलेला सोबत घेतले आणि मुलीशी अश्लील कृत्य करत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

चुलत बहीण आणि लहान भाऊ शाळा सुटल्यानंतर घरी गेली तेव्हा पीडित मुलीच्या आईने तुझी बहीण आली नाही का? अस विचारलं तेव्हा ती शाळेत आलीच नसल्याचे समोर आले. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आले.

Story img Loader